RBI News : देशातील अनेक बँका दिवाळखोरीत किंवा त्यामध्ये घोटाळे झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार पैसे गुतंवण्यासाठी सर्वात सुरक्षित बँकेचा पर्याय निवडत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील सर्वात सुरक्षित तीन बँकेबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार SBI सह देशातील आणखी बँकेमध्ये पैसे सर्वाधिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँका कधीही बुडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. SBI सह तीन बँकेमध्ये जनतेचा चांगला पैसा जमा आहे. या बँका देशासाठी महत्वाच्या राहिल्याचे देखील RBI ने म्हंटले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार ICICI बँक देखील देशातील सर्वात सुरक्षित बँक असल्याचे म्हंटले आहे. SBI आणि HDFC बँकाही उच्च श्रेणीत असल्याचे RBI कडून स्पष्ट करण्यात आले आहे. ICICI, HDFC आणि SBI या देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका आहे ज्या कधीही बुडणार नाहीत असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
बँकांची श्रेणी बदलली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेच्या श्रेण्या निश्चित करण्यात आल्या आहेत. SBI श्रेणी 3 मधून 4 आणि HDFC बँक 1 वरून 2 वर गेल्याचे पाहायला मिळत आहे. RBI ने SBI आणि HDFC बँक यांना डोमेस्टिक सिस्टिमली इम्पॉर्टंट बँक्स (D-SIBs) च्या यादीत वरच्या बकेटमध्ये हलवले आहे. बकेटमध्ये वरच्या दिशेने बदल झाल्यामुळे, दोन्ही बँकांना अधिक टियर 1 भांडवल ठेवावे लागेल. या बँकांना 1 एप्रिल 2025 पर्यंत टियर 1 पेक्षा जास्त भांडवल राखावे लागेल.
बँकेच्या अपयशाचा इतरांवरही परिणाम होतो
जर एखाद्या बँकेत अडचणी आल्या तर त्याचा परिणाम इतर बँकांवरही होऊ शकतो असे मध्यवर्ती बँकेने त्यांच्या आर्थिक अहवालात म्हंटले आहे. आरबीआयने म्हटले आहे की जर बँक अपयशी ठरली तर टियर 1 भांडवलावर 3.6% प्रभाव पडेल. पूर्वी प्रभाव 2.2% इतका अंदाजित होता. तर सर्व व्यावसायिक बँकांचा NPA सप्टेंबर 2024 पर्यंत 3.2% वरून 3.1% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरवर्षी अहवाल प्रसिद्ध करतो
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दरवर्षी बँकांचा आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर केला जातो. या अहवालात स्पष्ट होते की कोणत्या बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. यावरही देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर करण्यात आला आहे.