ताज्या बातम्या

New Year Resolution : नवीन वर्षात करा ‘या’ ठिकाणी गुंतवणूक, कमी वेळेत व्हाल लखपती

Published by
Ahmednagarlive24 Office

New Year Resolution : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी या वर्षासाठी संकल्प केले असतील. काहींनी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्त श्रीमंत होण्याचा संकल्प केला असेल. जर तुम्हीही असा संकल्प केला असेल तर तुम्ही निश्चितच श्रीमंत व्हाल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कमी वेळात लखपती होऊ शकता. होय, जर तुम्ही म्युच्युअल फंड या योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमचे कमी वेळेत विशेष म्हणजे या वर्षी अधिक श्रीमंत होऊ शकता.

ही योजना दीर्घकालीन भांडवली नफा मिळवण्यासाठी फायद्याची आहे. परंतु, गुंतवणुकीच्या या क्षेत्रात बाजारातील जोखमीचा धोका जास्त आहे. तसेच तुम्हाला दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो.

जर तुम्ही नवीन असाल आणि या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही आपण तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ही  योजना निवडताना, संशोधन करा आणि फक्त त्या योजनांमध्ये गुंतवणूक करा ज्यात परतावा जास्त मिळतो.

तुम्ही शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करू शकता. तसेच म्युच्युअल फंडांच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक केली तर बाजारातील जोखीम जास्त असते. गुंतवणुकीचे हे क्षेत्र अनेक अनिश्चिततेने भरलेले आहे.

देशात आणि जगात होत असलेल्या उलथापालथींचा थेट गुंतवणुकीवर परिणाम होतो. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. जर तुम्ही शेअर बाजारात हुशारीने आणि नियोजनपूर्वक गुंतवणूक केली तर तुम्हाला कमी कालावधीत उत्तम परतावा मिळू शकतो.

जर तुम्ही चांगले संशोधन आणि तज्ञांचा सल्ला घेऊन येथे पैसे गुंतवले तर तुम्हाला कमी वेळेत चांगला परतावा मिळू शकतो.

Ahmednagarlive24 Office