जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हा दाखल करा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- जिल्हा रुग्णालयात शासकीय योजनेतून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परंतु सदरचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविताना सर्व शासकीय नियम डावलून कोणत्याही प्रकारची टेंडर प्रक्रिया न राबविता, जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता मर्जीतील लोकांना काम देण्यात आले.

यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. माहितीच्या अधिकारात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माहिती मागवून ही सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना पाठविली असून, आजतागायत याबद्दल कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

या सर्व प्रक्रियेस जबाबदार असणाऱ्याांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जागतिक महामारी कोरोना काळात शासनाचा मिळालेला निधी व झालेला खर्च याचे कुठलेही टेंडर काढण्यात आलेले नाही.

कोविड काळात जिल्हा रुग्णालयाने खरेदी केलेल्या प्रत्येक बाबीचे स्पेशल ऑडिट करण्याची गरज आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्री.दळवी यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24