अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- कोरोनाची लाट ओसरत आली आहे त्याचबरोबर देशात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यामुळे बाजरात सकारात्मक वातावरण पाहायला मिळते आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाला होता. मात्र कालपासून शेअर बाजार उच्चांक गाठत आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी बाजार नवीन उंचीवर खुला आहे.
BSE सेन्सेटिव्ह इंडेक्स Sensex 31.62 म्हणजेच 0.06 वर 53,190.47 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE Nifty 14.80 अंकांनी किंवा 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 15,939.00 वर उघडला.
BSE च्या 30 शेअर्स पैकी 18 शेअर्सची वाढ होत आहे तर 12 शेअर्सची घसरण दिसून येत आहे. त्याचबरोबर NSE च्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्सची वाढ झाली आहे.
या शेअर्समध्ये तेजी :- BSE मध्ये आयटीसी, सन फार्मा, भारती एअरटेल, डॉ. रेड्डी, रिलायन्स, एशियन पेंट्स, टाटा स्टील, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बँक, एम अँड एम, टायटन, पॉवर ग्रिड, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, अल्ट्रा टेक सिमेंट, नेस्ले इंडिया, मारुती आणि टीसीएस शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.
या शेअर्समध्ये घसरण :- एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, इंडसइंड बँक, एलटी, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स घसरले.