शेअर बाजारात 5 दिवसांत गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटींचे नुकसान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-आज व्यापारानंतर बीएसई सेन्सेक्स ५८५.१० अंकांनी खाली येऊन ४९,२१६.५२ च्या पातळीवर बंद झाला.

त्याशिवाय निफ्टी इंडेक्स १६३.४५ अंकांनी घसरला असून ते १४,५५७.८५ च्या पातळीवर बंद झाले आहेत. देशभरात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे गुंतवणूकदारांच्या चिंता पुन्हा वाढू लागल्या आहेत,

ज्यामुळे आजच्या शेवटच्या व्यवसायात घट दिसून आली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक रेड मार्कवर बंद झाले आहेत. गेल्या पाच सत्रात सेन्सेक्‍स २,०६२ अंकांनी तर निफ्टी ६१६ अंकांनी कमी झाला आहे.

या विक्रीमुळे आज गुंतवणूकदारांचे आज ३ लाख कोटी रुपयांचे तर गेल्या पाच दिवसात ९ लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले. गेल्या पाच दिवसापासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या तेजीत हात्या. मात्र आज त्यांनी सपाटून मार खाल्ला.

हे शेअर्स होते तेजीत :- सेन्सेक्सच्या टॉप 30 शेअर्स पैकी 9 शेअर्स ग्रीन मार्कमध्ये बंद झाले आहेत. याशिवाय सर्व शेअर्स रेड मार्कवर बंद झाले आहेत. ITC टॉप गेनर्सच्या लिस्टमध्ये आहे.

त्याचबरोबर बजाज ऑटो, मारुती, भारती एअरटेल, ओएनजीसी, बजाज फिन, पॉवर ग्रिड आणि एचडीएफसीही ग्रीन मार्कवर बंद झाले आहेत.

या शेअर्स मध्ये घसरण :- एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, डॉ. रेड्डी, टेकएम, रिलायन्स, एनटीपीसी, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनस्व्ह, एलटी, एसबीआय, इंडसइंड बँक, एचडीएफसी यांचा समावेश आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24