iPhone 12 : ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा iPhone 12, मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 12 : iPhone ची किंमत जरा जास्त असते. कंपनी आपल्या प्रत्येक फोनमध्ये हटके आणि उत्तम फीचर्स देत असते. ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होतो. विशेष म्हणजे किंमत जरी जास्त असली तरी अनेकजण iPhone खरेदी करतात.

परंतु काहींना तो खरेदी करता येत नाही. जर तुम्हाला स्वस्तात iPhone खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. तुम्ही आता फ्लिपकार्टवरून iPhone 12 खरेदी करू शकता. आतापर्यंतची सर्वात मोठ्या सवलतीत तुम्ही तो खरेदी करू शकता. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. जाणून घ्या ऑफर.

या ठिकाणी मिळत आहे iPhone 12 वर मोठी सवलत

ग्राहकांना आता Apple iPhone 12 (ब्लॅक, 64 GB) स्टोरेज मॉडेल फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या की फ्लिपकार्टवर सेल संपल्यानंतरही, ग्राहकांना सवलतीसह खरेदी करता येईल. फोनच्या वास्तविक किंमतीबद्दल सांगायचे झाले तर, ते फ्लिपकार्टवर 49,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 19 टक्के डिस्काउंटसह, ग्राहकांना तो केवळ 39,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

घेता येईल एक्सचेंज ऑफरचा लाभ

आयफोन 12 साठी या डीलमध्ये एक्सचेंज ऑफरचा देखील समावेश आहे. iPhone 12 जास्त स्वस्तात विकत घेण्यासाठी तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन द्यावा लागणार आहे. ज्याच्या बदल्यात तुम्हाला 35,599 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट मिळणार आहे.

जाणून घ्या iPhone 12 ची खासियत

या डीलमध्ये, APPLE iPhone 12 (ब्लॅक, 64 GB) स्टोरेज वेरिएंटबद्दल बोलले जात आहे जे A14 बायोनिक चिपवर काम करते. 5G सेवेसह हा iPhone 12 6.1-इंचाच्या सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येतो. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे तर, याच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये दिलेले दोन्ही सेन्सर 12MP चे आहेत आणि फ्रंट कॅमेरा देखील 12MP चा आहे. ड्युअल सिम सेवा असलेल्या या फोनमध्ये तुम्हाला एक वर्षाची ब्रँड वॉरंटी देखील दिली जाईल.