Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

iPhone 12 Offer : आयफोनप्रेमींसाठी सुवर्णसंधी! अवघ्या 20 हजारांत खरेदी करता येतोय iPhone 12, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

iPhone 12 Offer : जगभरात आयफोनचे चाहते खूप आहेत. आयफोन दरवर्षी आपले अनेक फोन लाँच करत असते. सर्वसामान्य फोनपेक्षा आयफोनची किंमत जास्त असते. त्यामुळे प्रत्येकालाच आयफोन खरेदी करता येत नाही. परंतु जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे आता आयफोन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्ही आता iPhone 12 अवघ्या 20 हजारांत खरेदी करू शकता. 59990 रुपयांच्या आसपास या फोनची किंमत आहे. परंतु तो तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या.

जाणून घ्या iPhone 12 सवलत

iPhone 12 च्या 64GB वेरिएंटची किंमत 59990 रुपयांच्या जवळ आहे परंतु तो Flipkart वर 53,999 रुपयांना लिस्ट करण्यात आहे. तसेच तुम्हाला यावर HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे.

या फोनवर एकूण 33,000 रुपयांचे एक्सचेंज डिस्काउंट दिली जात आहे. जर तुम्ही जुन्या फोनची देवाणघेवाण करून हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला Android फोनच्या बजेटमध्ये iPhone 12 मिळू शकतो. तसेच ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर 3,000 रुपयांची अतिरिक्त एक्स्चेंज सवलत देण्यात येत आहे. समजा तुमच्या फोनची स्थिती चांगली असल्यास तुम्ही जवळपास 20,000 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता.

जाणून घ्या आयफोन 12 चे फीचर्स

कंपनीकडून या फोनमध्ये उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले असेल. तसेच, फोन A14 बायोनिक चिपसेटवर काम करेल आणि त्याच्या मागील बाजूस दोन 12MP कॅमेरे असणार आहेत. तर फ्रंटमध्ये कंपनीकडून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.