iPhone 13 : भारीच! iPhone 13 वर मिळेल जबरदस्त सवलत, स्वस्तात करा खरेदी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 13 : नुकतीच iPhone 15 सीरिज लाँच झाली आहे. या सीरिजच्या फोनमध्ये उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय असेल. इतर फोनपेक्षा iPhone ची किंमत जास्त असते.

परंतु आता तुम्ही iPhone 13 खूप मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. अर्ध्यापेक्षा कमी किमतीत तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. Amazon वर अशी उत्तम संधी मिळत आहे. लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

iPhone 13 वर मिळेल शानदार सवलत

किमतीचा विचार केला तर iPhone 13 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 59900 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही हा फोन Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान हे 50999 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. या फोनवर तुम्हाला 15 टक्के इतकी मोठी सूट देत असून इतकेच नाही तर तुम्ही फोनवर बँक किंवा एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेता येईल.

घेता येईल बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ

कंपनीच्या या शानदार फोनवर HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 750 रुपयांपर्यंतची झटपट सवलत मिळेल, खरेदीदारांना एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेता येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन iPhone 13 सोबत तुमच्या जुन्या स्मार्टफोनची एक्सचेंज तुम्ही त्यावर करून 45000 रुपयांची सवलत देखील मिळवू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या फोनवर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या आयफोन 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीच्या iPhone 13 मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1200 nits पर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करेल. हे A15 बायोनिक SoC आणि 6-कोर CPU द्वारे समर्थित असून या फोनमध्ये 12MP ड्युअल-कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. तसेच 12MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. हे 2X पर्यंत ऑप्टिकल झूम तसेच 5X पर्यंत डिजिटल झूमचे समर्थन असणार आहे. iPhone 13 नवीन लाँच झालेल्या iOS 17 ला देखील सपोर्ट करणार आहे.