iPhone 14 Offer : नववर्ष २०२३ सुरु झाले आहे. अशा वेळी जर तुम्ही नववर्षात iPhone खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. कारण Flipkart ने घोषणा केली आहे की ते नवीनतम iPhone मॉडेलवर सर्वोत्तम ऑफर देत आहे.
ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने त्याच्या प्लॅटफॉर्मवर एक टीझर पोस्ट केला आहे ज्यामध्ये iPhone 14 आणि iPhone 14 Plus ‘रॉक बॉटम किमतींवर’ ऑफर दिल्या जात आहेत.
फ्लिपकार्ट आयफोन 14 मालिका सवलतीच्या दरात ऑफर करत आहे आणि ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने सर्वात कमी किंमतीत iPhones ऑफर करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
iPhone 14 मालिका लॉन्च केल्यानंतर Apple ने घोषणा केली होती की जुन्या आवृत्तीची किरकोळ किंमत 69,990 रुपये केली जाईल. त्यामुळे, फ्लिपकार्ट iPhone 13 वर सुमारे 20,000 रुपयांची सूट देत आहे. मात्र, ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध करून देण्यात आली आणि कंपनीने विक्रीदरम्यान किंमत वाढवली आहे.
असे मानले जाते की फ्लिपकार्ट आयफोनच्या नवीनतम सेटसह असेच काहीतरी करण्याचा विचार करीत आहे. कंपनीने या ऑफरच्या टीझरमध्ये म्हटले आहे की हे नवीन वर्षाचे सर्वात मोठे सरप्राईज आहे.
फोन किती किमतीत उपलब्ध आहे
Apple iPhone 14 चे 128GB स्टोरेज सध्या Flipkart वर 5910 रुपयांच्या सवलतीनंतर 73,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. याव्यतिरिक्त, खरेदीदार HDFC बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 4,000 रुपयांची झटपट सूट घेऊ शकतात, ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत 69,990 रुपयांपर्यंत खाली येते.
याशिवाय, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 23,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. याचा अर्थ असा की सर्व बँक ऑफर आणि सवलतींसह, तुम्ही Apple iPhone 14 Flipkart वरून फक्त 46,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.