iPhone 15 : आयफोन 15 मध्ये असू शकते आत्तापर्यंतचे सर्वात मोठे फीचर, जाणून घ्या कॅमेरा, स्टोरेज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 15 : आयफोन 14 लॉन्च झाल्यानंतर ग्राहकांनी हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी खूप धरपड केली आहे. मात्र आता आयफोन त्याची आयफोन 15 सिरीस लॉन्च करणार आहे.

सध्या ऍपल डिजिटल ट्रेंड ऍपल पेरिस्कोप लेन्स तंत्रज्ञानावर काम करत आहे. पेरिस्कोप चांगली झूम क्षमता प्रदान करते. पेरिस्कोप लेन्समध्ये ऑप्टिकल झूम उपलब्ध असेल. सध्या उपलब्ध असलेल्या 5x आणि 10x ऑप्टिकल झूमपेक्षा हे अधिक प्रभावी असेल.

सध्याचे iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max फक्त 3x ऑप्टिकल झूम पर्यंत जातात. पेरिस्कोप लेन्स हे iPhone 15 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य असू शकते.

टायटॅनियम चेसिस

2023 मध्ये Apple च्या आगामी iPhone 15 मध्ये टायटॅनियम चेसिस आणि वक्र मागील कडा असल्याचे लीक झाले आहे. @ShrimpApplePro या Twitter वापरकर्त्याच्या मते, iPhone 15 च्या मागील कडा गोलाकार होतील आणि नवीन बॉर्डर तयार करेल.

डिस्प्ले

iPhone 15 बद्दल जी माहिती समोर येत आहे त्यानुसार Apple त्याचे चार प्रकार लॉन्च करणार आहे. iPhone 15 आणि iPhone 15 Pro चा डिस्प्ले 6.1 इंच असू शकतो, तर iPhone 15 Plus आणि iPhone 15 Pro Max 6.7-इंचाच्या डिस्प्लेसह येऊ शकतो.

नवीन चिपसेट

डिजिटल ट्रेंडच्या अहवालानुसार, Apple iPhone 15 मध्ये A16 चिपसेट वापरू शकते. सध्या तो iPhone 14 Pro मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय नवीन चिप A17 iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये असू शकते.

2 TB स्टोरेज

iPhone 15 Pro मधील RAM 6GB ऐवजी 8GB असू शकते. जरी iPhone 15 चे स्टोरेज फोनमध्ये कोणते फीचर्स दिले जात आहेत यावर अवलंबून असेल. iPhone 14 Pro मध्ये 1 TB स्टोरेज दिले जात आहे. असे मानले जाते की iPhone 15 Pro 2TB पर्यंत असू शकतो.