iPhone 15 Plus : iPhone अनेकांकडे असतात, परंतु काहींना ते जास्त किंमत असल्याने खरेदी करता येत नाही. जर तुम्हाला iPhone खरेदी करायचा असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही खूप कमी किमतीत iPhone खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपायांची बचत होऊ शकते.
जाणून घ्या iPhone 15 Plus ऑफर
iPhone 15 Plus (128GB) 89,900 रुपयांना लॉन्च केला आहे. फ्लिपकार्टवर देखील हीच किंमत असून फ्लिपकार्टकडून या ठिकाणी कोणतीही सूट देण्यात आली नाही. हे कंपनीने ऑफर केलेल्या किमतीत उपलब्ध असून बँक आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत.
बँक ऑफर
समजा तुम्ही iPhone 15 Plus खरेदी करण्यासाठी बँक ऑफ बडोदा कार्ड वापरले तर तुम्हाला 3,000 रुपयांची शानदार सवलत मिळेल. त्यानंतर या फोनची किंमत 85,900 रुपये इतकी होते. इतकीच नाही तर यावर एक एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध असून ज्याद्वारे तुम्हाला मोठ्या डिस्काउंटमध्ये फोन खरेदी करता येईल.
एक्सचेंज ऑफर
हे लक्षात घ्या की iPhone 15 Plus वर 39,150 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध असून जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदलला तर तुम्हाला इतकी सवलत मिळेल. परंतु तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असल्यास मॉडेल नवीनतम असेल तरच तुम्हाला 39,150 रुपयांची सवलत मिळेल. जर तुम्ही पूर्ण बंद करण्यात यशस्वी झाला तर या फोनची किंमत 46,750 रुपये इतकी असणार आहे.
तसेच Apple च्या iPhone 15 Plus ची रचना अगदी iPhone 14 Plus सारखीच असेल हे लक्षात घ्या. परंतु यावेळी कोपरे सपाट न ठेवता किंचित वक्र ठेवला आहे. याशिवाय डायनॅमिक आयलंडही यामध्ये उपलब्ध असतील. कॅमेरा 48MP सह देखील उपलब्ध असून यात लाइटनिंग पोर्टऐवजी यूएसबी-सी पोर्ट चार्जिंगसाठी उपलब्ध आहे.