iPhone 15 Pro Max : शानदार संधी! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा iPhone 15 Pro Max, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 15 Pro Max : नुकतीच Apple ने iPhone 15 सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने शानदार फीचर्स दिले आहेत. त्यापैकी आयफोन 15 प्रो मॅक्स हे सीरिजचे टॉप मॉडेल आहे. ज्याची किंमत खूप जास्त आहे. परंतु आता ते तुम्ही स्वस्तात घरी नेऊ शकता.

त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. iPhone 15 Pro Max च्या बेस व्हेरिएंट 256GB स्टोरेजची किंमत 1,59,900 रुपये आहे.आता तुम्हाला कमी किमतीत iPhone 15 Pro Max हा फोन खरेदी करता येईल. कसे ते जाणून घ्या.

हाँगकाँगमध्ये iPhone 15 Pro Max ची किंमत

भारत आणि हाँगकाँगमध्ये iPhone 15 Pro Max ची किंमत जाणून घेऊयात. Apple वेबसाइटनुसार, भारतीय बाजारात iPhone 15 Pro Max च्या बेस व्हेरिएंट 256GB स्टोरेजची किंमत 1,59,900 रुपये इतकी आहे. हाँगकाँगमध्ये या फोनची किंमत HK$10199 (रु. 1,08,058) ठेवली आहे. म्हणजेच या फोनची किंमत जवळपास 50 हजार रुपयांनी कमी होते.

29 सप्टेंबर रोजी दिल्ली ते हाँगकाँगचे फ्लाइट तपासले तर एअर इंडियाचे परतीचे फ्लाइट रु. 28,138 असून तुमच्यासाठी हा सर्वात उत्तम पर्याय आहे, समजा तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्ही हॉटेल मुक्काम करू शकता. तसेच ट्रॅव्हल वेबसाइट्सवर, हाँगकाँगमधील 3 तारांकित हॉटेलचे रात्रीचे भाडे 3 ते 5 हजार रुपये इतके आहे.

दुबईमध्ये iPhone 15 Pro Max ची किंमत

या ठिकाणी iPhone 15 pro max ची किंमत थोडी जास्त असून या ठिकाणी तुम्हाला फोन जवळपास 1.15 लाख रुपयांना मिळणार आहे. हाँगकाँगच्या तुलनेत या ठिकाणी फ्लाइट 8 ते 10 हजार रुपयांनी कमी आहे. दोन रात्री मुक्काम. तुम्हाला Apple iPhone वर ग्लोबल वॉरंटी देते. म्हणजेच तुम्ही Apple चे फोन जगात कुठेही खरेदी करू शकता.

जाणे योग्य आहे?

या फोनची किंमत व्हिसा आणि प्रवेश शुल्कामुळे थोडी जास्त असेल. भारतीय बाजारपेठेत हे फोन खूप महाग आहे. जर तुमच्या ओळखीचे कोणीतरी हाँगकाँग किंवा दुबईला गेले असेल तर, तुम्ही त्यांच्याकडून फोन मागू शकता. तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरेल.