iPhone 15 Pro Price : iPhone 15 प्रो मॉडेल्सच्या बदलल्या किमती! खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 15 Pro Price : नुकतीच Apple ने आपली iPhone 15 ही सिरीज लाँच केली आहे. इतर मॉडेल्स पेक्षा या फोनच्या किमती खूप जास्त आहेत. त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही त्यांना हे फोन खरेदी करता येत नाहीत. कंपनीने यात उत्तम फीचर्स दिले आहेत.

जर तुम्ही आयफोन 15 प्रो मॉडेल खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आयफोन 15 प्रो मॉडेल्सची झपाट्याने मागणी वाढली आहे. तुम्हाला ते 20 हजारांपर्यंत अधिक पैसे देऊन खरेदी करावा लागणार आहे, मागणी वाढली असल्याने कंपनीच्या या फोनची किंमत वाढली आहे.

भारतासह विविध बाजारपेठांमध्ये नवीन iPhone 15 मॉडेल्सना चांगली मागणी होत आहे. त्यामुळे Apple ने iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मॉडेल्सची डिलिव्हरी काही मार्केटमध्ये नोव्हेंबरपर्यंत ढकलण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max आधीच अनेक अधिकृत किरकोळ विक्रेत्या दुकानांवर स्टॉक संपलेले आहेत.

जास्त दराने विक्री

आयफोन 15 प्रो मॉडेल भारतात त्यांच्या अधिकृत किमतीपेक्षा जास्त किमतीत विकण्यात येत आहेत. तरीही ग्राहक अतिरिक्त पैसे देण्यास तयार आहेत. माहितीनुसार, iPhone 15 Pro Max चे 256GB नॅचरल टायटॅनियम व्हेरिएंट 20 हजार रुपयांपर्यंत जास्त किमतीत विक्री केले जात आहे.

ज्या ग्राहकांना आयफोन 15 प्रो टायटॅनियम ब्लू मॉडेल पाहिजे त्यांच्यासाठी हा फोन 6000 रुपयांच्या महागड्या किमतीत विक्री केला जात आहे. किमतीचा विचार केला तर भारतीय बाजारात, 256GB स्टोरेजसह iPhone 15 Pro Max च्या बेस मॉडेलची किंमत 159,900 रुपये इतकी आहे. तुम्हाला 144,900 रुपयांना iPhone 15 Pro चे 256GB मॉडेल खरेदी करता येईल. 128GB स्टोरेज असणाऱ्या बेस मॉडेलसाठी iPhone 15 Pro ची किंमत 134,900 रुपयांपासून सुरू आहे.

प्रचंड मागणी

वास्तविक अॅपलला आयफोन 15 प्रो मॅक्सच्या मोठ्या मागणीमुळे उत्पादनात अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आयफोन 15 प्रो मॅक्स इतर मॉडेलपेक्षा खूप वेगळा असून त्याचे उत्पादन ऍपलला वेळ लागेल.