iPhone Offer : त्वरा करा! Apple च्या ‘या’ मॉडेल्सवर मिळत आहे सर्वात मोठी सवलत, लगेचच आणा घरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone Offer : Apple चे फोन इतर स्मार्टफोनपेक्षा महाग असतात. अनेकांना ते इच्छा असून खरेदी करता येत नाही. परंतु तुम्ही आता iPhone 14, 13 आणि 12 खूप मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर अशी शानदार ऑफर मिळत आहे.

जाणून घ्या iPhone 14 (128GB) ऑफर

किमतीचा विचार करायचा झाला तर या फोनची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे. तसेच या डीलमध्ये फोनवर 18% सूट देण्यात येत आहे. त्यामुळे डिस्काउंटनंतर या फोनची किंमत 56,999 रुपये झाली आहे. इतकेच नाही तर एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत आणखी 41,150 रुपयांनी कमी करता येते.

बँक ऑफरमध्ये तुम्हाला या फोनवर 10% अतिरिक्त सव्कत मिळेल. कंपनीचा हा फोन 6.1″ सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह A15 बायोनिक चिपसेट मिळेल. या फोनच्या मागील बाजूस 12-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे.

जाणून घ्या iPhone 13 (128GB) ऑफर

या फोनची मूळ किंमत 59,900 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही फोनला 51,999 रुपयांना खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये तुम्ही फोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी करता येईल. शिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत 24,600 रुपयांनी आणखी कमी करता येईल. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप आणि 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत असून त्याचा डिस्प्ले ६.१ इंच आहे.

आयफोन 12 ऑफर

कंपनीच्या या फोनच्या 64 GB वेरिएंटची मूळ किंमत 49,900 रुपये इतकी आहे. परंतु सेलमध्ये, तुम्हाला 40,999 रुपयांमध्ये डिस्काउंटनंतर खरेदी करू शकता. या फोनवर 1000 रुपयांची बँक डिस्काउंट दिला जात आहे.

इतकेच नाही तर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही हा फोन 24,600 रुपयांपर्यंत स्वस्त खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले पाहायला मिळेल. हा फोन A14 बायोनिक चिपसेटवर काम करत असून त्याचा मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे. तसेच त्यात फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आहे.