Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

iPhone SE Offer : स्वस्तात 5G आयफोन खरेदी करण्याची संधी! ‘या’ ठिकाणी अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार, पहा ऑफर

iPhone SE Offer : आयफोनच्या किमती या स्मार्टफोनपेक्षा जास्त असल्याने प्रत्येकालाच तो खरेदी करता येत नाही. परंतु, तुमच्याकडे आता खूप स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही आता मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत 5G iPhone SE 3rd जनरेशनचा फोन खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या फोनची मूळ किंमत 49,900 रुपये इतकी आहे. परंतु Amazon तुम्हाला आता कमी किमतीत फोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे. सर्वात अगोदर हे लक्षात ठेवा की ही ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे त्वरित हा फोन खरेदी करा.

जाणून घ्या ऑफर

Amazon कडून iPhone SE (3rd जनरेशन) वर ऑफर्स दिली जात आहे. या फोनचे 64GB स्टोरेज असणारे मॉडेल 49,900 रुपयांना खरेदी करण्याची संधी आता तुमच्याकडे आहे. मात्र तुम्ही ते आता निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. कारण Amazon कडून या फोनवर 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. तसेच बँकेच्या या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही या आयफोनवर 1500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.

समजा, जर तुम्ही दोन्ही ऑफरचा पुरेपूर लाभ घेण्यास सक्षम असल्यास तुम्ही 50,000 रुपये किमतीचा हा फोन फक्त 23,400 रुपयांमध्ये (₹49900 – ₹25000 -₹1500) खरेदी करू शकता.

जाणून घ्या फीचर्स

हा अॅपलचा iPhone SE 3rd जनरेशन असणारा फोन 5G सपोर्टसह येतो. कंपनीकडून यात 4.7-इंचाचा रेटिना एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1334×750 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 625 निट्स ब्राइटनेससह येतो. कंपनीचा हा फोन A15 बायोनिक चिपसेटसह येतो, जो 5G नेटवर्कला सपोर्ट करतो.

हा फोन 12-मेगापिक्सेल रियर कॅमेरासह येत असून जो एकाधिक कॅमेरा फीचर्स आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे. कंपनीने यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 7 मेगापिक्सेल लेन्स दिली आहे. हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर 15 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.