IPL 2023 : यंदाच्या मोसमातील आयपीएलचा पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली लढत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात होणार आहे. 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
यंदा 74 सामने खेळवले जाणार आहेत. परंतु आयपीएल 2023 सुरू होण्याआधीच त्याच्या विजेत्याची घोषणा झाली आहे. संजय मांजरेकर यांच्या भविष्यवाणीने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी विजेत्या संघाचे नावच नाही तर अनेक अंदाज त्यांनी वर्तवले आहेत.
संजय मांजरेकरांच्या भविष्यवाणीने हादरले क्रिकेट विश्व
दरम्यान एक मुलाखतीत संजय मांजरेकर यांनी IPL 2023 ची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचे नाव सांगितले आहे. त्यांनी विजयी होणाऱ्या संघाचे नाही तर अनेक अंदाज त्यांनी वर्तवले आहेत. यात मांजरेकर यांनी आयपीएल 2023 च्या विजेत्यापासून या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाचे नाव उघड केले असल्याने आता संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले आहे.
हा संघ होणार विजयी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहलीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होणार का, असा प्रश्न मांजरेकर यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी असे उत्तर दिले की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे गोलंदाजी आक्रमण खुप चांगले असून मला वाटते की विराट कोहली यंदाच्या ट्रॉफीवर नाव कोरेल, ट्रॉफी जिंकण्याचे त्याचे स्वप्न यावर्षी पूर्ण होईल. संघासाठी फाफ डू प्लेसिस खूप धावा करेल.
उमरान मलिक गाठणार 160 किमी प्रतितास वेग
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला आयपीएलच्या या मोसमात 160 किमी प्रतितास वेग गाठता येईल का, असा प्रश्नही मांजरेकर यांना विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले की, असे होऊ शकते. इतकेच नाही तर चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवून धोनी यावेळी आयपीएलला कायमचा रामराम ठोकणार का, असा प्रश्न मांजरेकर यांना विचारला, तेव्हा ते म्हणाले की, धोनीबद्दल काही सांगणे सध्या कठीण आहे.