Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

IPL 2023 : IPL मधून संघांच्या मालकांची कशी होते करोडोंची कमाई, जाणून घ्या सविस्तर

यावर्षीचा आयपीएल सामना हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संघांच्या मालकांची कमाई कशी होते.

IPL 2023 : 2023 चा आयपीएल सामना हा लवकरच खेळवले जाणार आहेत. यावर्षी अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली जाणार आहे तसेच त्यांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. इतकेच नाही तर यावर्षी कोणता संघ विजेता होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु, अनेकांच्या मनात आयपीएलच्या संघांच्या मालकांची कमाई कशी होते? पैसे कमावण्यासाठी त्यांच्याकडे कोणते कोणते मुख्य उत्पन्नाचे स्रोत असतात? बक्षीस रक्कम कशी आणि किती ठरवली जाते? जर तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील तर बातमी शेवटपर्यंत वाचा.

या 5 मार्गांनी संघांच्या मालकांची होते करोडोंची कमाई

1. मीडिया अधिकार महत्त्वाचे 

मीडिया अधिकार म्हणजेच सोप्या आणि साध्या भाषेत सांगायचे झाले तर ते चॅनल जे आयपीएलच्या संपूर्ण कार्यक्रमाचे कव्हर तसेच प्रसारण करते. बीसीसीआय आणि आयपीएलच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हे केवळ मीडिया हक्क आहेत.

जेव्हा पहिल्यांदा 2008 मध्ये आयपीएल आयोजित केली होती तेव्हा सेट मॅक्सकडून पुढील 10 वर्षांसाठी एकूण 8200 कोटी रुपयांचा मीडिया हक्क करार करण्यात आला होता. सेट मॅक्सने 2008 ते 2018 या कालावधीत IPL प्रसारित करण्यासाठी प्रत्येक वर्षी 820 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यातील 40 टक्के रक्कम ही फ्रँचायझीच्या मालकांना देण्यात येते.

2. टायटल स्पॉन्सरशिप महत्त्वाची

बीसीसीआय आता टायटल स्पॉन्सरशिपसाठी कंपनीकडून कोटी रुपये घेत असते. या रकमेपैकी रकमेतील काही भाग बीसीसीआय स्वत:कडे ठेवते तर उरलेला भाग हा फ्रँचायझीच्या मालकांना वितरित करते. DLF ने 5 वर्षांसाठी IPL च्या टायटल स्पॉन्सरशिपवर स्वाक्षरी केली असून ज्याची किंमत एकूण 200 कोटी रुपये इतकी होती. त्यानंतर पेप्सीने आयपीएलमध्ये 3 वर्षांच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी एकूण 240 कोटी खर्च केले आहेत.

2018 मध्ये, Vivo IPL कडून BCCI ला पुढच्या पाच वर्षांसाठी टायटल प्रायोजकत्व मिळवण्यासाठी 2200 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र, भारत-चीन वादामुळे, Vivo ला प्रायोजकत्वातून काढून टाकले आहे. त्यामुळे 2020 मध्ये, Dream11 ने BCCI कडून 220 कोटी रुपयांना शीर्षक प्रायोजकत्वावर स्वाक्षरी केली आहे. आयपीएल 2022 चे शीर्षक प्रायोजकत्व टाटा समूहाने घेतले असून ज्याची किंमत 2022-2023 साठी 439.8 कोटी इतकी आहे.

3. ब्रँड प्रायोजकत्व महत्त्वाचे 

हे लक्षात घ्या की ब्रँड प्रायोजकत्व हे आयपीएलमधील कमाईचे मुख्य स्त्रोत असून तुम्ही अनेकदा मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंच्या टी-शर्ट आणि लोअरवर ब्रँडचा लोगो छापलेला पाहिला असणारच. यात ब्रँड्सची नावे क्रिकेटच्या मैदानावर, सीमारेषेवर, बोडीन्सवर आणि स्टंपवर हायलाइट करण्यात येतात. ज्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात.

4. मर्चेंडाईज सेल्स

मर्चेंडाईज सेल्स म्हणजे फ्रँचायझी खेळाडूंच्या जर्सी, कॅप, किटवर आपल्या संघाचे नाव लिहितो इतकेच नाही तर त्यांची ऑनलाइन विक्री करतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नफा होतो.

5. बक्षीस रक्कम

आयपीएलमध्ये जिंकणाऱ्या संघासाठी बक्षिसाची रक्कम निश्चित केली आहे तसेच त्यातील अर्धी रक्कम फ्रँचायझीच्या मालकांना दिली आहे.

6. तिकीट विक्री

सर्वात महत्त्वाचे म्हणजे IPL तिकिटांच्या किमती फ्रँचायझींचे मालक ठरवत असतात. ज्याच्या विक्रीतून त्यांना प्रत्येक वर्षाला करोडोंचा फायदा होत आहे.