ताज्या बातम्या

IPL 2023: चाहत्यांना धक्का ! आयपीएलमध्ये दिसणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू ; अनेक चर्चांना उधाण

Published by
Ahmednagarlive24 Office

IPL 2023:  IPL 2023 साठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावली जाईल, पण इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स आयपीएलच्या पुढील हंगामात खेळताना दिसणार नाही.

2023 मध्ये होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी त्याने पुढील वर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेणे आपल्यासाठी सोपे नव्हते, असे त्याने म्हटले आहे. ख्रिस वोक्स आयपीएलमध्ये फारसा प्रभावी ठरला नाही आणि फ्रँचायझी त्याच्यावर मोठा पैसाही खर्च करत नाहीत.

मात्र, 23 डिसेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल मिनी लिलावात त्याला कोट्यवधी रुपये मिळू शकतात. ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना वोक्सने खुलासा केला की आयपीएल वगळण्याचा निर्णय त्याच्यासाठी सोपा नव्हता परंतु अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला काउंटी चॅम्पियनशिपमध्ये वॉर्विकशायरकडून खेळायचे होते. आम्ही तुम्हाला सांगतो दुखापतीमुळे वोक्स 2022 च्या संपूर्ण उन्हाळ्यात खेळू शकला नाही.

त्याने ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, ‘हा कोणत्याही अर्थाने सोपा निर्णय नव्हता कारण आयपीएल ही एक उत्तम स्पर्धा आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप आर्थिक फायदा होतो, पण मी केवळ आर्थिक फायदा लक्षात घेऊन निर्णय घेतला नाही. अनेकांशी बोलून मी हा निर्णय घेतला.

23 डिसेंबर रोजी आयपीएल लिलाव

आयपीएलची मिनी 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या लिलावात 405 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्यावर कोटींचा पाऊस पडू शकतो.

हे पण वाचा :-  Flipkart Offers :  भन्नाट ऑफर ! ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘हा’ दमदार  5G स्मार्टफोन ; फीचर्स पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Ahmednagarlive24 Office