Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

iQOO Sale : महागडा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी! iQOO 11 5G च्या खरेदीवर वाचतील तुमचे हजारो रुपये

iQOO Sale : iQOO ही स्मार्टफोन निर्माता कंपनी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. काही दिवसांपूर्वी या कंपनीने iQOO 11 5G हा फोन केला होता. या फोनची किंमत कंपनीने 59,999 रुपये इतकी ठेवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु तुम्ही आता हाच फोन खूप मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. अशी शानदार संधी तूम्हाला Amazon वर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत होऊ शकते. परंतु हे लक्षात ठेवा की अशी ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या.

हा फोन सध्या Amazon India वर 54,990 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध करण्यात आला आहे. इतकेच नाही तर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला या फोनची किंमत आणखी 19,700 रुपयांनी कमी करता येईल. परंतु हे लक्षात घ्या की या जुन्या फोनसाठी तुम्हाला मिळणारे एक्सचेंज हे त्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा शक्तिशाली फोन 16 GB पर्यंत रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. एक्सटेंडेड रॅम 3.0 फीचर असणाऱ्या या फोनमध्ये कंपनीकडून यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 2  चिपसेट प्रोसेसर देण्यात येत आहे.

या फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये तुम्हाला 1440×3200 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.78 इंच 2K AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले जात आहेत.

यात 50-मेगापिक्सेल मुख्य सेन्सरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 13-मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा सेन्सर यांचा समावेश असणार आहे. तर सेल्फीसाठी कंपनीकडून या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येत आहे.

या फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 5000mAh ची असून जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत आहे. या चार्जिंग तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे हा फोन 25 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. तसेच जोपर्यंत OS चा संबंध आहे, तोपर्यंत हा फोन Android 13 आउट-ऑफ-द-बॉक्स वर आधारित Funtouch OS 13 वर चालेल.