iQOO Z7 : iQOO च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. iQOO Z6 ही सीरिज कंपनीने चीनमध्ये लाँच केला होता. अशातच आता लवकरच कंपनी आपला आगामी स्मार्टफोन iQOO Z7 लाँच करणार आहे. कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे.
कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनचे पोस्टरही रिलीज झाले आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार याची नेमकी तारीख कंपनीने अजूनही जाहीर केली नाही. परंतु, कंपनीच्या इतर स्मार्टफोनप्रमाणे या फोनमध्येही भन्नाट फीचर्स पाहायला मिळतील.
आगामी स्मार्टफोनचे पोस्टर iQoo इंडियाचे सीईओ निपुण मेरी यांनी रिलीज केले आहे. त्याने पोस्टरसोबत ‘झीस्टी’ स्मार्टफोनचे संकेत दिले असून या पोस्टरनुसार, iQoo Z7 सह आयताकृती कॅमेरा मॉड्यूल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे. ज्यात दोन लेन्स असणार आहेत. इतकेच नाही तर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) देखील कॅमेरासह आढळू शकते.
iQoo Z7 पोस्टरमध्ये टील कलरसह दर्शविले असले तरी ते इतर रंग प्रकारांमध्ये देखील ऑफर केले जाण्याची दाट शक्यता आहे. कंपनीकडून अजूनही iQOO Z7 च्या इतर फीचर्स आणि किंमतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
लीक झालेल्या रिपोर्टनुसार, iQOO Z7 5G आणि iQOO Z7 Pro 5G भारतात iQOO Z7 सीरीज अंतर्गत लॉन्च केले जाणार आहेत. नवीन वापरकर्त्यांना या दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसरसह LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेज मिळणार आहे.