iQOO Z7s 5G : होईल 15 हजारांपर्यंत बचत! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा 5G फोन, पहा ऑफर

Published by
Ahmednagarlive24 Office

iQOO Z7s 5G : तुम्ही आता स्मार्टफोन खरेदीवर 15 हजारांपर्यंत शानदार सवलत मिळवू शकता. तुमच्यासाठी अशी ऑफर iQOO Z7s 5G वर मिळत आहे. अशी धमाकेदार ऑफर तुमच्यासाठी Amazon ने आणली आहे. या फोनची मूळ किंमत 23,999 रुपये इतकी आहे.

परंतु या सेलमध्ये, तुम्ही 16,999 रुपयांमध्ये डिस्काउंटनंतर तो सहज खरेदी करू शकता. तसेच बँक ऑफरद्वारे तुम्हाला फोनची किंमत 1500 रुपयांनी आणखी कमी करता येईल. शिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 15,100 रुपयांपर्यंत स्वस्त होईल.

जाणून घ्या iQOO Z7s 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

iQOO Z7s 5G या फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.38 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच त्याचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz असून कंपनी या AMOLED डिस्प्लेमध्ये 1300 nits पर्यंत पीक ब्राइटनेस लेव्हल उपलब्ध देत आहे.

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 8 GB व्हर्चुअल रॅम असून गरज असेल तर तुम्ही या फोनची एकूण रॅम 16 GB पर्यंत वाढवू शकता.

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Snapdragon 695 प्रोसेसर मिळेल. तर फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देत असून यामध्ये 2 मेगापिक्सेलचा बोकेह कॅमेरा 64 मेगापिक्सेल मुख्य लेन्स देत आहे. तर त्याच वेळी, कंपनी तुम्हाला सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील देत आहे.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी असून जी 44-वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा हा शानदार स्मार्टफोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करतो. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 5जी, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय कंपनीकडून देण्यात आले आहेत.

Ahmednagarlive24 Office