Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

iQOO Z7s 5G : मस्तच.. ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार iQOO चा आगामी 5G स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर

iQOO Z7s 5G : iQOO च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आता लवकरच आपला एक शानदार स्मार्टफोन लाँच करणार आहे. जो तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनी आता आपला आगामी फोन iQOO Z7s 5G लाँच करण्याच्या तयारीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान अनेक दिवसांपासून कंपनी या फोनवर काम करत आहे. यात कंपनीकडून 6MP प्राथमिक कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. जो Snapdragon 695 वर काम करेल. यात कोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिले जाणार जाणून घेऊयात सविस्तर.

या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी दिली जाणार आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीचा आगामी स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्ट, ब्लूटूथ 5.1 जीपीएस, 5जी, वाय-फाय 5, यूएसबी टाइप-सी पोर्ट तसेच 3.5 मिमी ऑडिओ जॅकने सुसज्ज असणार आहे. यात स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि 6GB/8GB रॅम असणार आहे, जी तुम्हाला नंतर आभासी रॅमने 8GB पर्यंत वाढवता येते. 128GB अंतर्गत स्टोरेज असून जे तुम्हाला microSD कार्डद्वारे वाढवता येईल.

किती आहे या फोनची किंमत?

कंपनीचा हा स्मार्टफोन तुम्हाला नॉर्वे ब्लू आणि पॅसिफिक नाईट या कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनच्या 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये इतकी असून 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला iQOO इंडिया वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर जावे लागेल. Amazon वर बँक ऑफर वापरल्यानंतर, तुम्हाला हा फोन Rs.17,499 मध्ये खरेदी करता येईल.

जाणून घ्या फीचर्स…

कंपनीच्या या फोनमध्ये OIS सपोर्टसह 64MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP दुय्यम कॅमेरा असणार आहे. तर त्याच्या फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा दिला जात आहे. iQOO Z7s 5G Android 13 वर आधारित FunTouch OS 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असून यात 6.38-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले कंपनीकडून आपल्या नवीन ग्राहकांसाठी देण्यात येत आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल, रिफ्रेश रेट 90Hz, टच सॅम्पलिंग रेट 360Hz तसेच 1300 nits पर्यंत पीक ब्राइटनेस पातळी आहे.