Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

IRCTC : महिलांसाठी खुशखबर! मिळणार ‘ही’ विशेष सुविधा, प्रवास होईल आरामदायी

आता महिला रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण रेल्वेकडून त्यांच्यासाठी एक विशेष सुविधा सुरु करण्यात आली आहे.

IRCTC : रेल्वेने दररोज असंख्य लोक प्रवास करत असतात. रेल्वेचे तिकीट कमी असते शिवाय रेल्वेचा प्रवास हा सर्वात आरामदायी असतो. रेल्वे आपल्या प्रवाशांच्या हितासाठी काही नियम कठोर करत असते. तर त्यांच्यासाठी नवनवीन सोयी सुरु करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या सोयी-सुविधांबद्दल अनेक प्रवाशांना माहिती नसते. त्यामुळे त्यांना याचा फायदा घेता येत नाही. रेल्वेकडून आता महिला प्रवाशांसाठी एक खास सेवा सुरु करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे महिलांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान काय आहे रेल्वेची ही विशेष सुविधा जाणून घेऊयात सविस्तर.

रेल्वेकडून सुरु करण्यात आली ही विशेष सुविधा

भारतीय रेल्वेकडून गर्भवती महिलांना तसेच पाच वर्षांखालील मुलांसोबत प्रवास करत असणाऱ्या महिलांना लोअर बर्थ उपलब्ध करून देण्यात येत आहे. रेल्वेमधील आरक्षित बर्थची रुंदी कमी असते त्यामुळे या महिलांना लहान मुलांना घेऊन प्रवास करता येत नाही. त्यांना रात्री झोप येत नसल्यामुळे आता महिलांसाठी राखीव असणाऱ्या लोअर बर्थमध्ये मुलाच्या बर्थची सोय केली आहे.

इतकेच नाही तर मूल या बर्थवरून खाली पडणार नाही याचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे. सर्वात म्हणजे आता या बर्थसाठी रेल्वे कोणतेही अतिरिक्त भाडे प्रवाशांकडून घेणार नाही. यासाठी आरक्षण तिकीट काढत असताना पाच वर्षांखालील मुलांचे नाव भरावे लागणार असून त्यांना बेबी बर्थ देण्यात येईल.

सध्या तरी ते चाचणी म्हणून काही गाड्यांमध्ये बसवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ मेलमध्ये दोन बर्थची रेल्वे प्रशासनाकडून व्यवस्था केली आहे. आता लवकरच इतर ट्रेनमध्येही बाळाचे बर्थ वाढवण्यात येतील.