IRCTC Share : अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात, परंतु केवळ काही मोजक्याच गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. जर तुम्ही रेल्वेच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वने आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे.
हे लक्षात घ्या की याबाबत IRCTC चे संचालक मंडळ जुलै-सप्टेंबर तिमाहीचे आणि चालू आर्थिक वर्षाचे सहामाही निकाल 7 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहे. IRCTC ने स्टॉक एक्स्चेंजला पाठवण्यात आलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, दुसऱ्या तिमाहीचे निकाल 7 नोव्हेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत. या बैठकीत लाभांशाचा निर्णय झाला तर त्याची रेकॉर्ड डेट १७ नोव्हेंबर असणार आहे.
यापूर्वी, IRCTC ने ऑगस्ट 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 2 रुपये किंवा 100 टक्के लाभांश दिला होता आणि इतकेच नाही तर या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने 3.5 रुपये अंतरिम लाभांश दिला होता. समजा या कंपनीने पुन्हा लाभांश जाहीर केला तर हा या वर्षातील तिसरा लाभांश असणार आहे.
हे लक्षात घ्या शुक्रवारी, ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या दिवशी, IRCTC चे शेअर्स जवळपास 2 टक्क्यांनी झेप घेऊन 658 रुपयांवर पोहोचले आहे. तसेच IRCTC शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 775 रुपये इतका आहे आणि कमी 557.15 रुपये इतका आहे. BSE वर उपलब्ध वेबसाइटनुसार, 27 ऑक्टोबरपर्यंत कंपनीचे मार्केट कॅप 52,720 कोटी रुपये इतका आहे.
हे लक्षात ठेवा की लाभांशाची रेकॉर्ड डेट ही एक्स-डिव्हिडंडच्या एक दिवसानंतरची असेल. रेकॉर्ड तारखेला, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांची यादी तयार करते ज्यांना लाभांश किंवा बोनस द्यायचा आहे. तसेच एक्स-डेट फिक्स्ड शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांचा या यादीत समावेश आहे.
IRCTC समभागांनी दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यात आला आहे. 2019 मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून हा शेअर 300 टक्क्यांपेक्षा झूप जास्त वाढला आहे, म्हणजेच केवळ 5 वर्षांत IRCTC शेअर्सने गुंतवणूकदारांच्या पैशामध्ये तीनपट वाढ केली आहे.