अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- बांगलादेश मुक्ती संग्रामाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तान पासून बांगलादेशला वेगळे करत स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा हा काँग्रेस नेतृत्वाचा आहे.

भारताच्या माजी पंतप्रधान, आयर्न लेडी स्व.इंदिरा गांधी यांच्यामुळेच आजचा शांत भारत आपल्याला पाहायला मिळत आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रक तथा काँग्रेसच्या बांगलादेश मुक्ती संग्राम अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक कॅप्टन प्रवीण डावर यांनी केले आहे.

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बांगलादेश मुक्ती संग्रामाला ५० वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने नवी दिल्ली येथील काँग्रेस नेते कॅप्टन प्रवीण डावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कॅप्टन डावर बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या माजी सैनिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभेदार सूर्यवंशी, प्रदेश सचिव दीप चव्हाण, ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे,

काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रिडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, इंटकचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष अज्जू शेख आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कॅ. डावर म्हणाले की, भारताच्या दोन सीमांवर पूर्वी पाकिस्तान आपले शेजारी राष्ट्र होते. आज एका बाजूला पाकिस्तान मध्ये सुरू असणाऱ्या कारवाया पाहिल्या तर सातत्याने भारताची अडचण होईल अशी भूमिका पाकिस्तानची असते.

हीच परिस्थिती जर बांगलादेशची निर्मिती झाली नसती तर त्याही ठिकाणी राहिली असती. मात्र इंदिरा गांधी यांनी आपल्या प्रभावी आणि कणखर नेतृत्वाच्या माध्यमातून बांगलादेशला मुक्ती मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये अभूतपूर्व योगदान दिल्यामुळे आज भारतामध्ये आपल्याला शांतता पाहायला मिळत आहे.

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये योगदान नव्हते. आज आपण भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाल्याबद्दल अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करतोय. बांगलादेश मुक्ती संग्रामाला देखील पन्नास वर्षे लोटली आहेत.

या सर्व ऐतिहासिक लढ्यांमध्ये काँग्रेसचे योगदान हे अतुलनीय आणि निर्विवाद आहे. मात्र भाजपच्या वतीने खोटे सर्जिकल स्ट्राइक करून नागरिकांमध्ये केंद्र सरकार कडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. मात्र काँग्रेसने कधी खोटे सांगितले नाही.

पण खरे जे आहे ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे असे आवाहन यावेळी काळे यांनी केले. यावेळी माजी सैनिक मुदस्सर शेख, निवृत्त कॅप्टन निमसे यांचा कॅ. प्रवीण डावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज गुंदेचा यांनी केले.

यावेळी सुभेदार सूर्यवंशी, ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हाण आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खलील सय्यद यांनी केले. शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ.बापू चंदनशिवे यांनी आभार मानले. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, राहुल गांधी विचार मंचचे शहराध्यक्ष सागर ईरमल, सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने,

युवक काँग्रेसचे गणेश भोसले, शहर सोशल मीडिया अध्यक्ष सौरभ रणदिवे, प्रमोद अबुज, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, माजी नगरसेविका जरीना पठाण, प्रदेश सेवादलाच्या माजी पदाधिकारी शारदाताई वाघमारे, राणीताई पंडित, हेमलता घाटगे,

राणीताई गायकवाड, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा खजिनदार मोहन वाखुरे, इम्रान बागवान, अजय मिसाळ, निसार बागवान, शरीफ सय्यद आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शकीला शेख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : यावेळी शकीला शेख यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. कॅ.डावर यांनी शकीला शेख यांना काँग्रेस पक्षाचा पंचा प्रदान करून पक्षात स्वागत केले.

यावेळी शकीला शेख म्हणाला की, किरणभाऊ काळे यांचे नेतृत्व आवडल्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. किरणभाऊ आणि काँग्रेस पक्षाकडून महिलांना सन्मानपूर्वक वागणूक मिळते म्हणून मला पक्षात यावेसे वाटले. या पक्ष प्रवेशासाठी माजी नगरसेविका जरिना पठाण यांनी पुढाकार घेतला.