ताज्या बातम्या

कुणी तरी आहे तेथे? चीनला सापडले परग्रहावरील सिग्नल, पण…

Published by
Ahmednagarlive24 Office

China News : नेहमी औत्सुक्याचा विषय अससेल्या परग्रहवासियांबद्दल, परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल विज्ञानाच्या साहाय्याने पद्धतशीरपणे शोध घेतला जात आहे. त्यासाठी जगभरातील अनेक रेडिओ दुर्बिणी यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसल्या आहेत.

अशातच चीनने दावा केला आहे की त्यांना परग्रहवासियांचे सिग्नल सापडले आहेत. चीन सरकार पुरस्कृत सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेलीच्या वृत्तानुसार, चीनने म्हटले आहे की त्यांच्या विशाल स्काय आय या दुर्बिणीने कदाचित परग्रहवासियांचे सिग्नल पकडले आहेत किंवा त्यांना असे सिग्नल सापडले आहेत.

मात्र काही काळातच मात्र या शोधाबद्दलचा अहवाल आणि पोस्ट हटवल्यासारखे दिसून आले. त्यामुळे याबद्दल अधिकच संशय निर्माण झाला असून चीन जगापासून काही लपवित आहे का? असा प्रश्न पडला आहे.

चीनची स्काय आय – जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणी आहे. या दुर्बिणीचा व्यास ५०० मीटर आहे. सप्टेंबर २०२० मध्ये, स्काय आय दुर्बिणेने अधिकृतपणे बाह्य जीवनाचा शोध सुरू केला.

२०१९ मध्ये गोळा केलेल्या माहितीवर प्रक्रिया करताना टीमला २०२० मध्ये संशयास्पद सिग्नलचे दोन सेट सापडले आणि एक्सोप्लॅनेट लक्ष्यांच्या निरीक्षण डेटावरून २०२२ मध्ये आणखी एक संशयास्पद सिग्नल सापडला, एक्स्ट्राटेस्ट्रियल सिव्हिलायझेशन सर्च टीमचे मुख्य शास्त्रज्ञ झांग टोन्जी यांनी ही माहिती दिली. मात्र, नंतर ती काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे अधिकच संशय निर्माण झाला आहे.

Ahmednagarlive24 Office