अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- २०२१ मध्ये आतापर्यंत सोन्याचा ४७ हजार ते ४९००० च्या दरम्यान सतत व्यवहार होत आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतींवर नजर टाकल्यास २०१९ मध्ये ५२ टक्के आणि २०२० मध्ये २५ टक्के वाढ झाली होती.
त्यामुळे यंदाही सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त शुभ खरेदी म्हणून सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. गेल्या वर्षी दिवाळीबद्दल बोलायचे झाले तर देशाच्या कानाकोपऱ्यात निर्बंध होते. यंदा तसे नाही. दुकाने उघडी आहेत आणि निर्बंध नगण्य आहेत. या वर्षी सप्टेंबरपर्यंत ७४० टन सोने आयात करण्यात आले आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे. दुसऱ्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्था अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसल्यामुळे अशा स्थितीत पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढून त्याची किंमत वाढण्यास सुरुवात होईल, असे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे मत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झालीय.
राजधानी दिल्लीत आज सोने 271 रुपयांनी स्वस्त झाले असून, त्याचा नवा दर 46887 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याचबरोबर चांदी 687 रुपयांनी स्वस्त झाली. चांदीचा नवा दर 63210 रुपये प्रतिकिलो आहे डॉलरच्या मजबुतीमुळे सोने-चांदीच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या (WGC) ताज्या अहवालानुसार, आर्थिक हालचालींमध्ये जोरदार वाढ आणि ग्राहकांच्या मागणीत सुधारणा झाल्यामुळे जुलै-सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी वार्षिक 47 टक्क्यांनी वाढून 139.1 टन झाली. WGC च्या मते, भारतातील सोन्याची मागणी कोविडपूर्व पातळीवर परत आली आणि ती तेजीत राहण्याची अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीवरही दबाव आहे. यावेळी ते $6.15 (-0.34%) च्या घसरणीसह $1796.45 प्रति औंस पातळीवर व्यापार करत होते.
चांदी सध्या $0.053 (-0.22%) नी घसरून प्रति औंस $24.067 वर व्यापार करत आहे. डॉलरच्या वाढीमुळे आज सोन्याच्या किमती दबावाखाली आहेत. सध्या डॉलर निर्देशांक 0.15 अंकांच्या (+0.16%) वाढीसह 93.50 वर आहे.