आरोग्य हा राज्यांचा विषय आहे ? मग आरोग्य मंत्रालय बरखास्त करा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- कोरोना महामारीच्या काळात संसदेत आरोग्य हा राज्यांचा विषय आहे, असे सांगण्यात आले.

मग केंद्रातील आरोग्य मंत्रालयासारखा पांढरा हत्ती पोसण्यात जनतेची भलाई कशी होऊ शकेल? मंत्रालयावर खर्च करणे आैचित्याचे आहे का? असा लेखी प्रश्न काँग्रेसचे छाया वर्मा व सपाचे सुखराम सिंह यादव यांनी उपस्थित केला.

आरोग्य हा विषय राज्यांच्या कक्षेत येतो का? असा प्रश्न खासदारांनी उपस्थित केला आहे. उत्तर होकारार्थी असल्यास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणसारख्या मंत्रालयावरील पैसा खर्च केला जाऊ नये.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय बरखास्त करण्याचा प्रस्ताव कॅबिनेट सचिवालय पंतप्रधान कार्यालयाला पाठवेल का? असा प्रश्नही विरोधी खासदारांनी उपस्थित केला. आरोग्य, स्वच्छता व रुग्णालये राज्यांच्या यादीत समाविष्ट होतात.

क्वारंटाइन, वैद्यकीय शिक्षण, व्यवसाय व संसर्गजन्य रोगांचा फैलाव रोखणे अन्य यादीत आहे. मंत्रालय जनतेच्या भलाईत महत्त्वाची भूमिका निभावते.

अहमदनगर लाईव्ह 24