ताज्या बातम्या

राकेश झुनझुनवालांचा ‘हा’ आवडता स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष असते. नुकतेच राकेश झुनझुनवाला यांचा पसंतीचा शेअर टायटनबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

टायटनच्या निकालांनंतर अनेक ब्रोकरेज फर्म्सने टायटनमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर गुंतवणूकीसह 2900 रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

स्टॉक 2900 रुपयांपर्यंत पोहचण्यासाठी वर्षभराचा कालावधीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 8 फेब्रुवारी 2022 रोजी टायटनची किंमत सुमारे 2,442 रुपये होती.

गुंतवणूकदारांनी सध्याच्या किंमतीवरून खरेदी केल्यास 458 रुपये प्रति शेअर किंवा सध्याच्या किमतीच्या सुमारे 19 टक्के परतावा मिळू शकतो.

गेल्या वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर हा शेअर जवळपास 57 टक्क्यांनी वधारला आहे. टाटा समूहाचा हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे.

गेल्या पाच वर्षांच्या परताव्याच्या तक्त्यावर नजर टाकल्यास गुंतवणूकदारांना 465 टक्क्यांहून अधिक नफा झाला आहे.दरम्यान राकेश झुनझुनवाला अँड असोसिएट्सची टायटन होल्डिंग 5.1 टक्के आहे.

8 फेब्रुवारी 2022 रोजी त्याचे मूल्य 11,057.8 कोटी रुपये होते. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 37 स्टॉक्स आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 34,396.9 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

Ahmednagarlive24 Office