त्या डॉक्टरांची आत्महत्या आहे की घातपात ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-पत्नी आणि दोन मुलांना इंजेक्शनद्वारे औषध देत त्यांना संपवून कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रथितयश डॉक्टर महेंद्र थोरात यांनी आत्महत्या केली आहे.

डॉ. थोरात राशीनजळच्या बारडगाव दगडी या गावाचे मूळ रहिवाशी आहेत. राशीनमध्ये येऊन त्यांनी हॉस्पिटल सुरू केले. ते चांगले चालत होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे स्नेहबंध वाढले होते. मात्र, आज अचानक त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. थोरात यांचे राशीनमध्ये हॉस्पिटल आहे. आज त्यांचे कुटुंबीय घरात मृतावस्थेत आढळून आले. डॉ. महेंद्र वर्षा थोरात, मोठा मुलगा कृष्णा (वय १६) व लहान मुलगा कैवल्य (वय ७) हे मृतावस्थेत आढळून आले. आधी तिघांना विषारी औषधाचे इंजेक्शन देऊन थोरात यांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. मुलाचे आजारपण सहन होत नसल्याने एका नामवंत डॉक्टरने त्याची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना राशीनमध्ये घडली आहे. एका प्रतिष्ठित डॉक्टर कुटुंबांने असे पाऊल उचलल्याने अनेकांच्या मनात संशय देखील निर्माण झाला आहे.

पोलीस या प्रकरणात आता ही आत्महत्या आहे की घातपात याचा कसून तपास करत आहेत. राशीनमधील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईन द्वारे इंजेक्शन देऊन स्वत: गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.

ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. ज्या खोलीत त्यांचे मृतदेह आढळले त्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी चिठ्ठी देखील लावली होती. त्या चिठ्ठीत डॉक्टरांनी असे लिहिले आहे की, चिठ्ठीत म्हटले आहे की, आम्ही आज आपल्यापासून कायमच निरोप घेत आहोत.

कृष्णाला कानाने ऐकू येत नाही. त्यामुळे त्याचे समाजामध्ये अपराधीपणाने राहणे आता सहन होत नाही. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित झालो आहोत.

कृष्णाचे कशातच मन लागत नाही. मात्र, तो कधी बोलून दाखवत नाही. मात्र, त्याचे हे दु:ख आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी संमतीने हा निर्णय घेतला आहे. याबद्दल कोणाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जबाबादर धरण्यात येऊ नये. असे कृत्य करणे आम्हाला योग्य वाटत नाही, मात्र इलाज नाही, आम्हाला माफ करा, असेही चिठ्ठीत म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24