Maharashtra : महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय? सामनातून भाजपवर हल्लाबोल

Maharashtra : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशूं त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. मात्र भाजपकडून याबद्दल कोणतीही भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी भाष्य केल्यानंतर भाजप खूपच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करूनही भाजपने कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता भाजप विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहे.

सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही.

Advertisement

उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. ‘महाराष्ट्र बंदची हाक देऊन जनमताचा उठाव घडविण्याची संधीही विरोधकांनी या प्रश्नी गमावली.

शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय?” असा प्रश्न सामनातून करण्यात आला आहे.

शिवाजी महाराज ‘नायक’ नसते तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचा घाट घातलाच नसता. टिळकांनी गणपती व शिवराय घरातून मांडवात आणले.

Advertisement

शिवाजी-भवानीच्य नावानेच संयुक्त महाराष्ट्राचा लढादेखील पेटवला व जिंकला गेला. मुंबई महाराष्ट्रास मिळाली. शिवसेनेसारखे ज्वलंत राष्ट्रीय बाण्याचे संघटन तर शिवाजी राजांच्या प्रेरणेतूनच उभे राहिले. शिवराय कालबाह्य झाले असते तर त्यांचे नाव कशाला कोणी घेतले असते? असे अनेक प्रश्न अग्रलेखातून विचारण्यात आले आहेत.