Credit Card : सध्या मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर होऊ लागला आहे. त्याशिवाय फसवणुकीचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांसाठी क्रेडिट कार्ड वापरणे त्रासदायक ठरत आहे.
परंतु, अनेकजण कार्ड वापरत असताना शिस्त न बाळगल्याने कर्जाच्या कचाट्यात सापडत आहेत. अशातच क्रेडिट कार्डची थकबाकी भरली नाही तर दंड भरावा लागतो का ? असा अनेकांना प्रश्न पडत असतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, क्रेडिट कार्ड जारी करण्याची जबाबदारी ज्या संस्था किंवा बँकेची आहे त्यांनाच फक्त ग्राहकांकडून कर्जाची रक्कम घेता येते.
हे लक्षात घ्या की बँका हे शुल्क फक्त तीन दिवस उशीरा पेमेंट चुकवल्यानंतरच घेऊ शकतात. 21 एप्रिल 2022 रोजी, RBI ने क्रेडिट आणि डेबिट कार्डशी संबंधित एक अतिशय महत्त्वाचा नियम जारी केला आहे.
क्रेडिट कार्ड जारी करणारी संस्था किंवा बँकेला केवळ तीन दिवसांपेक्षा जास्त काळ क्रेडिट कार्डची थकबाकी भरली नसेल तेव्हाच त्या ग्राहकाकडून विलंब पेमेंट घेता येते.
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला क्रेडिट कार्डशी संबंधित या नियमाची माहिती असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत क्रेडिट कार्ड पेमेंट केले नसेल तर तुमच्याकडे बिल भरण्यासाठी तीन दिवस आहेत.