हीच तुमची रूग्णसेवा ? जनता भयभीत असतांना लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांना दमबाजी करत होते !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- जनता भयभीत असतांना लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी व कोरोना काळात लढणार्‍या यंत्रणेतील अधिकार्‍यांना दमबाजी करत होते. हीच तुमची रूग्णसेवा का? असा सवाल श्री.विवेक कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

कोपरगाव मतदारसंघातील जनता संकटात असतांना त्यांना धीर देणार्‍यातील आम्ही असून त्यांना वार्‍यावर सोडून बालिश असल्यासारखे घरात बसून चंपलपाणी खेळणार्‍यातील निश्‍चितच नाही, अशी टिका जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी आ. आशुतोष काळे यांच्यावर केली आहेे.

करोना संकटकाळात गोरगरीब रूग्णांना आधार देण्याचे काम सातत्याने आम्ही करीत आलो, हे जनतेला ज्ञात असून गोरगरिबांना भोजन देण्यापासून तर बाधीत रूग्णांना उपचार घेण्यासाठी त्यांची हेळसांड करण्यात ज्यांनी धन्यता मानली, त्याचप्रमाणे इतर मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी केलेली

रूग्णसेवा कोपरगांवचे लोकप्रतिनिधी देऊ शकले नाही, त्यामुळे इतर तालुक्यातील कोविड सेंटरमधील सुविधांचा अभ्यास करून आम्ही अद्ययावत डेडिकेटेड कोविड सेंटर उभारून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले विवेक कोल्हे पुढे म्हणाले, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी घालून दिलेला

जनसेवेचा वारसा कोल्हे परिवाराच्या प्रत्येक पिढीने जपण्याचे काम केले आहे. करोना काळात कोणतेही ठोस योगदान नसलेल्या लोकप्रतिनिधींनी केवळ शासनाकडून आलेल्या योजनांचे फोटोसेसन केले. गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या महामारीच्या काळात जनतेला वार्‍यावर सोडण्याचे काम केले.

आम्ही करीत असलेल्या मदतीतही राजकारण केले. प्रथमतः रूग्णांना देण्यात येणार्‍या अन्नपाकिटावर फोटो छापून प्रसिध्दीची हौस भागविली. नंतर शासनाने सुरू केलेल्या कोविड सेंटरला नाव देण्याचा नाद पूर्ण केला. त्यानंतर आम्ही सुरू केलेल्या कोविड सेंटरला रुग्ण जावू नये यासाठी प्रयत्न केले.

बाधीत रुग्णांच्या भावनांशी खेळुन रूग्णांची हेळसांड करण्यात धन्यता मानली. राज्य व जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी स्वतःच्या तालुक्यातील जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी जीवाचे रान करत असतांना कोपरगावचे लोकप्रतिनिधी मात्र घरात बसून चंपलपाणी खेळत होते असे ही कोल्हे यावेळी यांनी सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24