ताज्या बातम्या

ATM Card : तुमचेही एटीएम कार्ड ब्लॉक झालंय? ‘या’ पद्धतीने करा अनब्लॉक

Published by
Ahmednagarlive24 Office

ATM Card : एटीएम कार्डमुळे बँकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत नाहीत. तसेच कितीतरी कामे सहज होतात. त्यात अनेकांचे एटीएम कार्ड अचानक ब्लॉक होते. 

जर तुमचेही एटीएम कार्ड अचानक ब्लॉक झाले असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्हाला ते सोप्या मार्गाने अनब्लॉक करू शकता. त्यामुळे तुमचे होणारे नुकसानही वाचेल.

फॉलो करा या स्टेप्स 

कस्टमर केअर

तुम्ही कार्ड अनब्लॉक करण्यासाठी कस्टमर केअरची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमचे काही मिनिटातच कार्ड अनब्लॉक होऊ शकते.

ई-मेल

तसेच तुम्ही आता ईमेलच्या मदतीने कार्ड अनब्लॉक करू शकता. ईमेल आयडीवरून तुम्ही तुमच्या बँकेला ईमेल करू शकता. तुम्हाला तुमची समस्या सांगावी लागेल.

आपोआप लॉक होते. 

जर तुम्ही एटीएम मशिनमध्ये कार्डचा पिन चुकीच्या पद्धतीने तीन वेळा टाकला तर तुमचे डेबिट कार्ड आपोआप लॉक होईल. हे सुरक्षिततेच्या कारणांमुळे होते.  तुम्हाला 24 तास प्रतीक्षा करावी लागेल आणि तुमचे कार्ड आपोआप अनब्लॉक होईल.

बँकेची मदत घेऊ शकता

तुम्ही तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेला भेट देऊ शकता. तुम्हाला त्यासाठी एक लेखी अर्जही द्यावा लागू शकतो. यानंतर तुमचे कार्ड बँक कार्ड अनब्लॉक करेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: ATM card