Insurance Claim : तुमचाही इन्शुरन्स कंपनीकडून नाकारला जातोय दावा? तर मग लगेच करा ‘हे’ काम

तुमचे वय, तुमचा वैद्यकीय इतिहास, उत्पन्न तसेच व्यवसायावर आधारित विमा दिला जातो. परंतु, काही जणांचा विमा कंपनी दावा फेटाळते.

Insurance Claim : खरं तर कोरोना महामारीनंतर आरोग्य विमा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या विमाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकजण आरोग्य विमा काढतात. अनेकांना त्याचा फायदा होतो तर अनेकजण याचा गैरफायदा घेताना आढळतात.

अशातच काहीजणांचा विमा संबंधित कंपनी फेटाळून लावते.याची काही कारणेही असू शकतात. परंतु, जर कोणतेही कारण नसताना विमा कंपनी तुमचाही सतत दावा फेटाळून लावत असेल तर तुम्ही त्यावर काही पाऊले उचलू शकता. दावा फेटाळून लावला तर अशावेळी काय करायचे ते जाणून घ्या.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दावा नाकारला जात असेल तर याची अनेक कारणे असू शकतात. काहीजण विम्याची नोंदणी करत असताना आरोग्याबाबत चुकीची माहिती देतात, कागदपत्रांमधील माहितीत फरक, अटी आणि शर्तींचे उल्लंघन करणे यांसारख्या चुका ते करतात. त्यामुळे अशावेळी विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते.

जर कंपनीने तुमचा विमा दावा नाकारला तर तुम्ही प्रथम तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे जाऊन दाव्याबाबत तक्रार नोंदवू शकता.

समजा जर तक्रारी देऊन 15 दिवसांनंतरही तुमच्या समस्येचे निराकरण झाले नाही तर तुम्ही याबाबत विमा नियामक IRDAI कडे तक्रार करू शकता.

तुम्ही IRDAI च्या Complaints@irdai.gov.in या मेल आयडीवर तुमची तक्रार नोंदवू शकता. तसेच तुम्ही 155255 किंवा 1800 4254 732 या क्रमांकांवर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता.