ताज्या बातम्या

याला म्हणतात नांद….! शेतीसाठी विदेशातली ऑफरला लाथ मारली; आज पंचक्रोशीत नाव गाजतया…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Krushi news :-आपल्या देशात आजही शेतीला व्यवसाय (Agriculture) म्हणून बघितले जात नाही. शेती केवळ उदरनिर्वाह भागवण्यासाठी असलेले एक साधन आहे असाच सर्वांचा समज झाला आहे.

जो कोणी चांगले शैक्षणिक करिअर घडविण्यास असमर्थ असतो तोच शेती करतो असा गैरसमज आता दिवसेंदिवस बळकट होऊ लागला आहे.

पालक देखील आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि चांगल्या कंपनीत किंवा सरकारी कार्यालयात नोकरी करावी असे स्वप्न उराशी बाळगतात. मात्र, शेती देखील नोकरी किंवा व्यवसायापेक्षा कमी नाही यातून देखील लाखोंचे पॅकेज कमवले जाऊ शकते.

हे दाखवून दिले आहे पंजाबच्या (Punjab) संगरूर येथील युवा महिला शेतकरी अमनजीत कौर हिने. अमनजीतच्या आई-वडिलांचे देखील स्वप्न होते की आपल्या मुलींना उच्च शिक्षण घ्यावे आणि चांगल्या कंपनीत नोकरी करावी.

मात्र अमनजीतला लहानपणापासून शेतीमध्ये रस होता, आणि तिने लहानपणीच ठरवले होते की आपल्याला शेतीमध्येच करिअर घडवायचे आहे. अमनजीतने आज शेतीमध्ये यशस्वी प्रवासाला सुरुवात केली आहे.

संगरूर जिल्ह्यातील मौजे कनौई येथील रहिवाशी युवा महिला शेतकरी अमनजीत शेती समवेतच उच्च शिक्षण देखील घेत आहे. आज अमनदीप कौर यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही, अमनदीप कौर या युवा महिला शेतकऱ्याला (Women Farmer) पंचक्रोशीत ट्रॅक्टर वाली कुडी म्हणून ओळखतात.

लहानपणापासूनच ती आजोबा हरदेव सिंग, वडील हरमिलाप सिंग आणि भाऊ गगनदीप सिंग यांना सकाळी तयार होऊन शेतात कामाला जाताना पाहायची.

शाळेला ज्या दिवशी सुट्टी असायची त्या दिवशी अमनजीत देखील वडिलांसोबत शेतात जायची. 22 वर्षीय अमनदीप कौरच्या वडिलांनी तीला ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित इतर शेतीची यंत्रे आणि मशीन चालवायला शिकवले आहेत.

आता ती गेल्या सहा वर्षांपासून ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, रसाळ, रीपरसह इतर शेती यंत्रे चालवते. निश्चितच महिला असून देखील हे सर्व कामे करून ती इतर महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे.

युवा महिला शेतकरी अमनदीप कौर (Amandeep Kaur, a young woman farmer) आपला शेतीचा छंद पूर्ण करण्यासाठी परदेशातही गेल्या नाहीत.

त्यांनी सांगितले की, 2019 मध्ये आयलेट्समध्ये साडेसहा बँड्स आल्यानंतर मेडिकल आणि ऑफर लेटरही आले होते. परदेशात राहून जी रोजंदारी करावी लागत होती, त्याऐवजी ती आता वडिलांना शेतीचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करत आहे, असे तिचे म्हणणे आहे.

अमनदीप कौर यांनी सांगितले की, तिने शेती क्षेत्रात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल तिला कृषी विज्ञान केंद्र अर्थात केव्हीके खेडीने आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 ला यंग सक्सेसफुल वुमन फार्मर अवॉर्डही दिला आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की फक्त शेतीच नाही तर अमनदीप कौर दुग्ध व्यवसायात देखील खूप निष्णात आहेत आणि घरात ठेवलेल्या चार दुभत्या जनावरांची सर्व देखभाल त्या स्वतः करतात.

अमनदीप घरच्या घरी भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करत असतात यासाठी ते पूर्ण सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करतात. अमनदीप आपल्या आजोबा आणि वडिलांसोबत धान्य मार्केट आणि भाजी मंडईत पिकांची विक्री करण्यासाठी देखील जात असते.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अमनदीपला शेतीची प्रचंड आवड आहे. याशिवाय ती खालसा कॉलेज, पटियाला येथून बी-व्होकेशनल फूड प्रोसेसिंग अँड इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे.

तिला एमएस्सी करायची आहे आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर करायची आहे. युवा महिला यशस्वी शेतकरी अमनदीप यांनी इतर मुलींना वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आवाहन केले आहे.

निश्चितच अमनदीप यांचे शेती क्षेत्रातील नेत्रदीपक यश आणि त्यांची शेतीची आवड इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे आणि भविष्यात शेतीकडे देखील नोकरी आणि व्यवसायाप्रमाणे बघितले जाईल अशी आशा आता बळकट होऊ लागली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office