‘या’ धार्मिकस्थळात गुलाल उधळण्यास,पेढे वाटण्यास मनाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-  महाशिवरात्रीमुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन दहिवडीचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी शिखर शिंगणापूर, वावरहिरे, डांगीरेवाडी आणि मोही या ठिकाणच्याही महादेव मंदिर परिसरांत १४४ कलम लागू केले आहेत.

आता या परिसरात पाच व्यक्तींना एकत्र येण्यास, गुलाल उधळण्यास, पेढे वाटण्यास आणि फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. महाशिवरात्रीला सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापुरात महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सलग तीन दिवस येथे भक्तांची मोठी रीघ असते.

मात्र पुणे, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांत कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकडेवारीमुळे शिवभक्तांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथे बुधवारपासून दिवस संचार बंदी लागू करण्यात आली आहे. गेल्यावर्षी चैत्री यात्रा संपल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत हे मंदिर बंद होते. त्यानंतर त्यात शिथिलता आणण्यात आली होती.

मात्र आता पुन्हा करोना वेगाने वाढत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून गर्दी टाळण्यासाठी यासह ग्रामीण भागात यात्रांवर बंधने आणली आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24