अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शहरी व ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास हे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या धोरणाचा अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील वळण येथील राजू मकासरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आले.
तनपुरे म्हणाले, पदाधिकाऱ्यांना पक्षात विशेष मान असल्याने मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पक्ष संघटना बांधणीचे काम आवश्यक आहे.
राजू मकासरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वळण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते बाळासाहेब खुळे, आरडगाव ग्रामपंचायत उपसरपंच सुनील मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.