अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- समाजाचे ऋण समजून कुठल्याच प्रसिद्धीची आपेक्षा न बाळगता अनेकजण कार्य करतात ,अशा निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करणे ही परंपरा जोपासणे गरज असल्याचे मत आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
नगरमधील सामाजिक कार्यकर्ते वयाच्या ७९ वर्षीही मुस्लीम समाजाच्या लग्न ,साखरपुडा कार्यक्रमात उर्दू भाषेत स्वागताचे व भाषांतराचे कार्य करणारे उत्तम सूत्रसंचालक सय्यद अजगर अकबर पटवेकर यांचा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करणात आला.
यावेळी ते म्हणाले की, पटवेकर यांच्या सारखे कार्य करणारे सामाजिक एकतेसाठी आदर्शवत आहेत.याप्रसंगी पै. अफजल व मान्यवरउपस्थित होते.
.याबद्दल कॉस्मिक सोसायटी व परिसरातील प्रा.कोल्हे सर ,प्रा.पाथरे,शेख अरशद,इरफान बागवान,आरिफ, अजीम, रोहित काळोखे,योगेश जगदाळे यांनी त्यांचे अभिनदन केले.