अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- निळवंडे पाणी पाइपलाइनचे श्रेय कोल्हे परिवाराला मिळू नये म्हणून निळवंडे पाइपलाइन आमदार काळे यांनी होऊ दिली नाही. आमची जिरवण्याच्या नादात कोपरगाव शहरातील नागरिकांची जिरवू नका; अनेक मंत्र्यांना बैठकीला बोलावून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम तालुक्यात झाले असून कोपरगाव तालुका पाण्यापासून अद्याप वंचित आहे.
शहराचे पाणी आडवणाऱ्या लोकप्रतिनिधी यांनी बाबांचा आशीर्वाद घ्यावा म्हणजे त्यांची कोर्टाची केस मागे होईल व ते अध्यक्ष होतील. मारामारीसाठी चौकात येण्याची भाषा आमदारांना शोभत नाही. आमची तशी संस्कृती नाही चौकात यायचे, असेल तर विकासाच्या मुद्द्यावर चौकात यावे, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली. नुकतेच नूतन उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांच्या पदग्रहण समारंभप्रसंगी विवेक कोल्हे बोलत होते.
भाजप नेते पराग संधान, उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, कैलास जाधव, राजेंद्र सोनवणे, विजय वाजे, विजय वडांगळे, विजय आढाव, मौलाना आसिफ शेख, मौलाना हमीद राही, रिजाय शेख, सद्दाम सय्यद, मेहमूद सय्यद, बाळासाहेब जपे, अकबर शेख, हाफिज बशीर रेहमानी, मौलाना शब्बीर शेख, अनवर शेख, हाजी सलिम शेख, खालीक कुरेशी, हाजी रशीद शेख, विनोद राक्षे, निसार पठाण, फकीर मोहम्मद पहिलवान,
दत्ता काले, स्वप्नील निखाडे, मौलाना निसार शेख, मौलाना मुक्तार शेख, जितेंद्र रनशूर, निसार शेख, नारायण अग्रवाल, वैभव गिरमे, पिंकी चोपडा, संतोष नेरे, सतीश काकडे, बापू काकडे, किरण सुपेकर, संजय सातभाई, दीपक वाजे आदी उपस्थित होते. यावेळी मेहमूद सय्यद म्हणाले, ४५ वर्षांनंतर मुस्लिम समाजाचा उपनगराध्यक्ष झाला आहे. काम करत असताना कोणताही माणूस एका जाती धर्माचा नसतो.
त्याला सर्व धर्माचे काम करावे लागते. राजकारणात एका पातळीपर्यंत करावे लागतात. त्यानंतर आपले संबंध जपायचे असतात. राजकारण संपल्यानंतर सर्वांनी हेवेदावे सोडून समाजकारणासाठी एकत्र आले पाहिजे. विवेक कोल्हे म्हणाले, आयुष्यात गुरुची गरज का असते हे मान्य होते. मुस्लिम समाजाला संधी दिली. मात्र समाजाला जितक्या वेळा म्हटले जाते. समाजाचा मतदानापुरते वापर केला जातो.
गेल्या अनेक वर्षांपासून शंकरराव कोल्हेंनी एक आदर्श विचारधारा रुजवली. यामुळे कोल्हे परिवार सर्व समाजातील लोकांना न्याय देण्याचे काम करत आहे. मुस्लिम समाजाला फक्त निवडणूकी पुरते वापरले जाते. मात्र, त्यामुळे कोल्हे परिवार मुस्लिम समाजाला न्याय देऊन नेहमी त्यांच्या बाजूने आहे. शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मात्र ४२ कोटी पाणीपुरवठा योजना अद्याप कार्यान्वित केली नाही हे दुर्दैव आहे.