अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही. अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही.
तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करू नका. एकाच ऑक्सिजन सिलेंडर ४ जण फोटो काढतात हे चांगले नाही. त्यातून आपल्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतो. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही.
समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे अशा शब्दात भाजपा नेते नितीन गडकरींनी नेते आणि कार्यकर्त्यांचे कान उपटले आहेत.
नितीन गडकरी म्हणाले की, नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच त्याचा भाग नाही, यावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा.
त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही. राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभं राहणं सामाजिक दायित्व आहे.
मला कोविड होत नाही म्हणून काहीजण गाफील राहतात. आजही अनेक नगरसेवक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोविडमध्ये बेफिकिरपणे वागतायेत असं त्यांनी म्हटलं.