अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-मागील चार पाच दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. यात श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला तर घारगाव, बेलवंडी भागात वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस पडला.
मागिल चार दिवसांत ३ वेळेस परिसरात पाऊस झाल्याने या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक जाते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.
बुधवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोळगाव परिसरात सोसाट्याच्या वारा सूरू होऊन ८ वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडटासह गारांचा पाऊस सुरू झाला. या पावसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पावसाने परिसरातील फळबागांचे, तसेच कांद्याचे, गव्हाचे मोठया प्रमानात नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील बेलवंडी, घारगाव या भागात वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस पडला. वादळामुळे कोळगाव, सुरेगाव, घुटेवाडी,
चिखलीसह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. मागिल चार दिवसांत ३ वेळेस परिसरात पाऊस झाल्यानें या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक जाते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.