अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- दोन तासात मा. उद्धवजी तुम्ही तुमच्या पोराचं तरी लग्न लावून दाखवा या निर्णयामुळे तुम्ही घरोघरी भांडण लावलं आहे.
माझ्या घरात पण कळत नाही काय करायच २ तासांत जर माझ्या घरात कोणाला काही झालं तर तुम्ही जबाबदार असाल लक्षात ठेवा, नवरीलाच तयार होण्यासाठी तासभर लागतो, मग २ तासात लग्न कसं उरकणार?
असे म्हणत अनेकांनी दोन तासांत लग्न ही अट जाचक आहे. ती े प्रत्यक्षात अंमलात आणणं कठीण जाईल असं मत सोशल मीडियावर नोंदवले आहे.
एकंदरितच लग्न समारंभाला २५ जणांची उपस्थिती हा मुद्दा योग्य वाटत असला तरी अनेकांनी दोन तासात लग्न ही अट जाचक असून ते प्रत्यक्षात अंमलात आणणं कठीण जाईल असं मत नोंदवल्याचं चित्र दिसत आहे.
२२ एप्रिल सायंकाळी आठ वाजेपासून १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत राज्य सरकारने कठोर निर्बंधांची नवी नियमावली जाहीर केली.मात्र लागू असणाऱ्या या नियमांमध्ये लग्नांसंदर्भातील नियम सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये करता येणार आहे.
तसेच लग्न समारंभातील सर्व विधी दोन तासांमध्येच पूर्ण करणं नवीन नियमांनुसार बंधनकारक आहे.
संपूर्ण लग्नाचा कार्यक्रमासाठी केवळ दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे. या लग्नासाठी एकूण २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. लग्नांसंदर्भातील या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला (वधू-वर) ५० हजार रुपये दंड ठोठवला जाईल.
तसेच हॉल व्यवस्थापनावरही कारवाई करण्यात येणार आहे. यावरुन सोशल मीडियावर अनेकांनी दोन तासात लग्न कसं करायचं?, दोन तासात लग्न शक्य तरी आहे का?, अशा गंभीर प्रश्नांबरोबरच मजेदार प्रतिक्रियाही दिल्या.
लॉकडाऊन नियमानुसार लग्नसोहळ्यासाठी फक्त २ तासाचा अवधी आणि २५ जणांच्या उपस्थितीची अट आहे. पण नवरीलाच तयार होण्यासाठी तासभर लागतो, मग २ तासात लग्न कसं उरकणार? जेवण कधी करणार? असे प्रश्न विवाह इच्छुकांना पडले आहेत.
त्यामुळे ‘लग्न पहावं २ तासात करुन’ वाक्य प्रचलित होणार!, लग्न समारंभ हा २५ माणसांना घेऊन फक्त २ तासात उरकायचा आहे…लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का???आहे???? लग्नासाठी जमलेल्या 25 जणांपैकी एकही पॉझिटीव्ह नसेल कशावरुन?
आणि तो पुढे किती जणांना बाधीत करेल याचा अंदाज कसा काढणार? यापेक्षा सर्व लग्न पुढे ढकलणे जास्त सोयीस्कर नाही का? कावे लागणार म्हणून खुश झाला असेल.