Maharashtra News:राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये नेमके काय झाले आणि काय सुरू आहे, हे आता हळूहळू उघड होत आहे. यासंबंधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयाने आपल्या सर्वांना दु:ख झाले. मात्र, ते पचवून आपण पुढे वाटचाल करीत आहोत, असे म्हणून पाटील यांनी तमाम भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील भावनाच जणू व्यक्त केल्या आहेत.
पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील की, “गेल्या अडीच वर्षातील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलाची गरज होती. हा बदल होत असताना असा एक नेता देण्याची गरज होती जो योग्य मेसेज देईल.
जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल. असे असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले.
केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी शिंदे यांना मुख्यमंत्री केले आपल्याला दुःख झालं.
पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हकायचा होता. केंद्राने निर्णय दिला आणि देवेंद्रजींनी तो मानला. यासाठी आपण सर्वांनी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.