अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाली नाही, हेच बरे झाले. अन्यथा बिनविरोध झालो असतो तर कारखानदार प्रस्थापित म्हणाले असते की, आमच्यामुळेच संचालक झाले.
मी संचालक झालो हे जिराईत भागातील शेतकऱ्यांच्या मतावर आणि शेतकऱ्यांनाही वाटत होते की, जिल्हा बँकेत मी संचालकपदी असावा. मी सर्व सामान्यांचा पुढारी आहे. माझ्या विजयातून आता प्रत्येकाला उत्तर दिले आहे.
संघर्ष केल्याशिवाय मलाही करमत नाही. बँकेमध्ये कर्डिलेंनी नव्हे तर कारखानदारांनीच खरा धुडगूस घातला आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री कर्डिले यांनी केले.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नगर तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने सत्कार करताना चेअरमन सुरेश सुंबे, व्हा.चेअरमन छत्रपती बोरुडे,
संचालक प्रा. संभाजी पवार, अंबादास बेरड, अंबादास शेळके, ज्ञानदेव शिंदे, जगन्नाथ कराळे, अनिल ठोंबरे, लक्ष्मण नरवडे, श्रीकांत जगदाळे, अप्पासाहेब कुलट आदी उपस्थित होते.
सुरेश सुंबे म्हणाले की, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका खरेदी विक्री संघाचे कामकाज चालते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे.