कोरोनाला हरविणे आता होणार सोपे … कारण आलेलं असं उपकरण जे करेल कोरोनाचा नाश !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- संपर्कात आलेल्या लोकांमुळेच कोरोना पसरत नाही. तर हवेतूनही पसरू शकतो. मात्र आता तुमच्या आजूबाजूच्या हवेत कोरोना आहे की नाही, हे सुद्धा समजणार आहे.

इतकंच नव्हे तर विषाणूंचा खात्माही करणार आहे, अशी दोन उपकरणं भारतीय तज्ज्ञांनी विकसित केली आहेत. केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेच्या चंडीगड इथल्या प्रयोगशाळेने एखाद्या ठिकाणच्या हवेत कोरोना विषाणू आहेत का हे तपासण्यासाठी, तसेच या विषाणूंना नष्ट करण्यासाठी अशी दोन नवी उपकरणं विकसित केली आहेत.

यापैकी एक एअर सॅम्पलर असून, दुसऱ्या उपकरणाचं नाव एअर प्युरिफायर असं आहे. हे अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पवर आधारित आहे. ही उपकरणं घर, शाळा, ऑफिसेस, मॉल, तसंच मोठ्या हॉलमध्ये बसवता येने शक्य होणार आहे.

एखाद्या ठिकाणच्या हवेत कोरोना विषाणू अस्तित्वात आहे, की नाही, याची तपासणी करणाऱ्या उपकरणाचं नाव पॅन सीएसआयआर एअर सॅम्पलर असं आहे. या छोट्याशा उपकरणात एअर कॉम्प्रेसर बसवण्यात आला आहे. हा कॉम्प्रेसर हवा आत खेचतो. त्याच्या आतल्या बाजूला एक मेम्ब्रेन आहे. त्यावर हवेतले कोरोना विषाणू जमा होतात.

वीज आणि बॅटरीवर चालणाऱ्या या उपकरणाची किंमत सुमारे पाच हजार रुपये आहे. हे उपकरण बाजारात आणण्यासाठी सीएसआयआरने ५ कंपन्यांसोबत भागीदारीही केली आहे. एअर सॅम्पलर जाळीच्या माध्यमातून हवा आत खेचून घेतो.

यातल्या मेंम्ब्रेनवर हवेतून येणारे सूक्ष्मकण चिटकतात. मेम्ब्रेनवर सूक्ष्म कणांमध्ये विषाणूंचा समावेश नाही हे संध्याकाळी लॅबमध्ये जाऊन तपासणं आवश्यक आहे. त्यात विषाणू आढळून आला, तर हे उपकरण ज्या ठिकाणी लावलं होतं, तेथील लोकांना अलर्ट करणं सोपं जाणार आहे.

हे उपकरण सध्या रेल्वेतले काही कोच, एसी बस, ऑडिटोरियम, सीएसआयआरच्या काही कार्यालयांमध्ये बसवता येऊ शकतात. याची किंमत ठिकाणानुसार ३ हजारांपासून ते २० हजार रुपयांपर्यंत असेल.

अहमदनगर लाईव्ह 24