अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-राज्यात सध्या लागू असलेला जमावबंदीसह कडक निर्बंध ३० एप्रिल नंतरही पुढेही कायम राहणार आहे.
१ मे नंतर पुढील १५ दिवस हेच निर्बंध कायम राहण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे.
या माहितीनुसार १५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली कोणत्याही परिस्थितीत निर्बंध वाढवावेच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.
३० एप्रिलपूर्वी मुख्यमंत्री तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
त्यात हे निर्बंध १५ दिवस वाढवायचे किंवा किती यावर निर्णय घेतला जाईल.किमान १५ दिवसांची वाढ होईल असा माझा अंदाज आहे,
असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.राज्यात १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत कठोर निर्बंध लागू आहेत.कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी
हा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्बंध लादण्यात आल्यानंतर राज्यात काही सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
सोमवारी (२६ एप्रिल) राज्यातील नवीन बाधितांचा आकडा ४८ हजारांपर्यंत खाली आला होता. तर दुसरीकडे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढताना दिसत आहे.
त्यामुळे लॉकडाऊन वाढवल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मदत होणारच आहे शिवाय आरोग्य यंत्रणेवरील ताणही त्यातून कमी होणार आहे.
आरोग्य व्यवस्थेच्या अनुषंगाने काही तातडीची कामे तडीस नेण्यासही हातभार लागणार आहे. यासाठीच लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सरकार करत आहे.