अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- खंडणी आरोप प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरूद्ध ईडीने लूकआऊट नोटीस बजावल्याचे मलाही माध्यमातूनच कळले.
या प्रकरणी आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्याने कायद्याच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी चौकशीला समोर जावे हेच योग्य होईल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे माध्यमांशी बोलताना केले.
करुणा शर्मा प्रकरणात एक तर सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आणि बोलण्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचा कारण नाही.
तिथे घडलेल्या घटनेवरून कायदा आणि सुव्यवस्था कशा स्वरूपात ठेवली जात आहे हे स्पष्ट होत आहे. करुणा शर्मा प्रकरणी निःपक्ष चौकशी झालो पाहिजे. गाडीत बंदूक मिळणे आणि बंदुक ठेवल्याचा व्हिडिओ आणि नंतर मिळालेले पिस्तुल हे सर्व गंभीर आहे.
दबावाविना चौकशी झाली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. गणेशोत्सवाबाबत सरकारच्या निर्णयावर काही बोलण्यासारखे नाही, असेही ते म्हणाले.