माझा जीव माझीच जबाबदारी म्हणण्याची वेळ आली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी कारभारामुळेच जनतेवर आता ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असे म्हणण्याची वेळ आली असल्याची टिका भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

जनतेला सल्ले देण्यापेक्षा ‘प्रवरे’ प्रमाणे व्यवस्था उभी केली असती तरी कोविड संकटात जनतेला दिलासा मिळाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.संगमनेर तालुक्यातील निमोण येथील पुष्पगंध सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या

कोविड सेंटरचे उद्घाटन आ. विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. कोविड नियमावलीचे पालन करून हा औपचारिक कार्यक्रम संपन्न झाला. पुष्पगंध सेवाभावी संस्थेचे संदीप देशमुख, सरपंच दगडू घुगे, सोनेवाडीचे सरपंच शरद पवार, भाजपच्या किसान आघाडीचे अध्यक्ष सतिष कानवडे, गंगाधर कांडेकर,

त्र्यंबक गोमासे उपस्थित होते. आ. विखे पाटील म्हणाले, सरकारच्या घोषणा आणि नियोजन फक्त कागदावर राहीले. माझे कुटूब माझी जबाबदारी या घोषणेचे काय झाले ? महाविकास आघाडी सरकारची कोणतीच यंत्रणा मदतीला नाही.

सरकारच्या निष्काळजीपणामुळेच आता जनतेवर माझा जीव माझीच जबाबदारी असे म्हणण्याची वेळ आली आहे. या संकटात लोकांना मदत करून आधार देण्याची गरज होती, पण मंत्री फक्त दौरे करून काळजी न करण्याचे सल्ले देतात. प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने राज्यातील पहिले कोविड रुग्णालय सुरू केले.

डॉ. विखे पाटील फाऊंडेशन आणि शिर्डी संस्थांनच्या रूग्णालयातून सुमारे एक हजार बेडची व्यवस्था झाली आहे. निमोण येथे सुरु करण्यात आलेल्या

कोविड केअर सेंटरमध्ये १०० बेडची व्यवस्था करण्यात आल्याचे संदीप देशमुख यांनी सांगितले. साहेबराव घुगे, गोरख घुगे, रोहीणी तपासे, शिवराम इलग, एकनाथ शेळके उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24