पुष्पा का जलवा ! बीडचे आमदार म्हणाले…’मै झुकेगा नही…’

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला आहे. अनेकांना या चित्रपटाची चांगलीच भुरळ पडली असून अनेकजण या चित्रपटातील डायलॉग म्हणताना दिसत आहेत.

यातच आता बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील यात कमी नाहीत. बीडमध्ये एका सभेला संबोधित करताना आ. क्षीरसागर यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हटला.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांनी पुष्पा स्टाईल ‘मैं झुकेगा नही…’ असं म्हणताच समोर बसलेल्या जमावातून मोठा जल्लोष झाला. ‘निवडणुकीत सर्वजण एकत्र लढणार आहेत.

माझ्या पाठिशी तरुण वर्ग आहे, आई-बहीणींचा आशिर्वाद आहे, असेही क्षीरसागर यावेळी म्हणाले. दरम्यान, संदीप क्षिरसागर यांच्या आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील भाजपला टोला लगावताना ‘झुकेंगे नही’, असं म्हटलं होतं.

यावरुन पुष्पाची क्रेझ राजकारण्यांमध्येही असल्याचे दिसून येत आहेत. कोण आहेत संदीप क्षिरसागर ? संदीप क्षिरसागर हे राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांचे पुतणे आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जयदत्त क्षिरसागर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांचे पुतणे संदीप क्षिरसागर यांना बीडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत पुतण्याने काकाचा अवघ्या 1984 मतांनी धक्कादायक पराभव केला होता.